Wednesday, September 2, 2020

भाग-२ सोशल मीडिया आणि तरुणाई

 


  

मागील भागात आपण सोशल मीडियाबद्दल थोडीशी माहिती घेतली. पण जाता जाता आपल्याला एक प्रश्न पडला होता. तो म्हणजे; 

अशा या बहुपयोगी आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी खुल्या असलेल्या सोशल मिडीयाकडे सर्वात जास्त प्रमाणात तरुणाईच का बरं आकर्षित झाली??? 

त्यामागची काही कारणं आपण या भागात समजून घेऊ.

युवा वय किंवा कुमारवय हे वयच ताण तणाव किंवा वादळाचं वय म्हटलं जातं. या वयात मुलामुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यामुळे मनात विचारांची प्रचंड खळबळ माजलेली असते. “लाथ मारेन तिथे पाणी काढेन!” असा दांडगा उत्साह असतो. एखादी गोष्ट किंवा बऱ्याचदा मनात आलेली तीव्र भावना कोणापाशी बोलून दाखवावी हे कळत नसतं.  अशावेळी आपल्याबरोबरच्या, समवयस्क व्यक्तीला आपलं हे बोलणं पटेल आणि आपल्या मनाचं समाधान होईल असं तरुणांना वाटू लागतं. पण दरवेळी तो माणूस आपल्या समोरच असेल असं काही नाही किंवा काहीवेळेस फोन वर नीट बोलताही  येत नाही अशावेळी whatsapp, facebook, इ. सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स कामी येतात आणि म्हणूनच मुलांची पसंती याकडे जास्त पहायला मिळते.

यामध्ये आणखी एक सर्वात महत्वाचं  कारण म्हणजे  तरुणांची असलेली ‛grasping power’ म्हणजेच ‛आकलनशक्ती’, ही इतर  वयातील माणसांपेक्षा अधिक  असते . म्हणूनच कोणतंही  ज्ञान किंवा नवीन  तंत्रज्ञान आत्मसात करण्याची किंवा शिकण्याची प्रवृत्ती तरुणांकडे जास्त  पहायला मिळते. त्यामुुळेच काळाच्या ओघात विकसित झालेल्या नवीन गोष्टींशी तरुणाई लवकर जुळवून घेऊ शकते.



त्याचबरोबर या वयात ‛peer pressure’  हाताळणं ही एक अतिशय अवघड गोष्ट असते.  आपल्या ‛friend circle’ मध्ये  एखादी गोष्ट चर्चेत असेल तर त्याचा परिणाम साहजिकच त्या समूहातील प्रत्येक व्यक्ती वर होतो. त्यामुळे ती गोष्ट निश्चितच करावीशी वाटते. मग ते कोणताही ऑनलाइन गेम खेळणं असो अथवा अन्य उपकरणांंचा वापर असो जिकडे समूहाचा कल,  त्याच गोष्टी समूहाच्या प्रभावाखाली येऊन एखादा तरुण करू पाहतो. म्हणून तरुणाई सोशल मिडियाकडे वळण्याचं हे एक कारण असू शकतं.

peer pressure बरोबरच या वयात  तरुण पिढीमध्ये ‛spotlight syndrome’ दिसून येतो. म्हणजे या वयात मुलामुलींना आपण सतत चर्चेत राहावं असं वाटत असतं.तसंच सर्वांचं सतत आपल्याकडे लक्ष आहे असं तरुणांना वाटत असतं. त्यामुळेच आपण  सर्वांमध्ये ‛trending’ कसे राहू याचा प्रयत्न प्रत्येक तरुण करत असतो. मग ट्रेंड म्हणून एखादी गोष्ट पोस्ट करणं असो वा फक्त ट्रेंड म्हणून एखादी सिरीज बघणं अथवा ऍप  वापरणं असो  सतत चर्चेत राहण्यासाठी तरुण हे सर्व करू पाहतात.

सोशल मीडियामुळे हल्लीचं जग खूप जवळ आलंय. आपण घरबसल्या आपल्या मनातील एखादी गोष्टं जगाच्या पाठीवर कोठेही याद्वारे पोहोचवू  शकतो. याच संधीचा फायदा अनेक तरुण व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मग ते अगदी ‛e-commerce’ असो वा ‛digital marketing’. हे तरुण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली उत्पादनं किंवा सेवा जगाच्या पाठीवर कुठेही पुरवू शकतात आणि त्यातून त्यांना प्रचंड नफा देखील मिळतो. त्याचबरोबर पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा  अनेक सोशल नेटवर्किंग  तसंच informative साईट्स चा आधार घेतात. यामधून ते अनेक तज्ज्ञांची ‛lectures’  किंवा ‛seminars’ घरबसल्या attend  करू शकतात. यामुळे त्यांंना फक्त पुस्तकी ज्ञान न मिळता व्यवहार ज्ञान देेखील प्राप्त होते. तसच शिक्षणानंंतरच्या अनेक व्यावसायिक व अर्थार्जनाच्या संधींबाबत त्यांना माहिती मिळते. म्हणूनच या तरुणाईला सोशल मीडिया आपलासा वाटतो.

ही आणि अशी बरीच ‛चांगली- वाईट’ कारणं आपल्याला देता येतील की ज्यामुळे आजची तरुणाई सोशल मिडीयाकडे जास्त वळते. त्याचे फायदे आणि तोटे  देखील बरेच असू शकतात.त्याचबरोबर त्याचे अनेक चांगल्या व वाईट गोष्टींसाठी देखील वापर होऊ शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सोशल मीडियामधील संधी आणि दुरुपयोग; याबद्दल आपण पुढच्या भागात  चर्चा करणार आहोत.

माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर  जास्तीत जास्त SHARE  करा ! त्याचबरोबर नवीन ब्लॉगच्या UPDATES साठी माझ्या ब्लॉग ला FOLLOW करा !  आणि या विषयावर आपली काय प्रतिक्रिया आहे ती मला COMMENT BOX  मध्ये नक्की कळवा !

 


16 comments:

  1. well-written🙌😇👍...keep going!

    ReplyDelete
  2. अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी लेख!!👌👌 Keep it up!!👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद🙏🏻

      Delete
  3. अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी लेख!!👌👌 Keep it up!!👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद 🙏🏻

      Delete
  4. कुछ समज नहि आया पर देख के अछ्छा लगा... किप it अप! ✌️

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you sir hope next time I serve something you understand 😄

      Delete
  5. वरद नेहमीसारखंच सुरेख!छान मुद्दे मांडतोस

    ReplyDelete

दशावतार