Saturday, August 29, 2020

भाग १- सोशल मीडियाची ओळख

 



“या सोशल मीडियामुळे पार  बिघडत चालली आहेत आज कालची पोरं !"  “नुसत्या त्या सिरीज,युुु ट्यूब,आणि अखंड  सोशल  साईट्स वर पडून असतात!"

पण फक्त हे सगळं म्हणजेच सोशल मीडिया का?  नाही!  मग नेमकं सोशल मीडिया म्हणजे काय ?

मीडिया म्हणजेच माध्यम.  एक असं माध्यम जे 

व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद वाढवण्यास मदत करतं, जे समाजातील अनेक समस्यांवर चर्चेच्या रूपाने एक चांगला उपाय शोधण्यास मदत करतं, लोकांना एकटेपणा भासू न देण्यासाठी जे अनेक प्रकारच्या मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करतं . थोडक्यात  माणसाला आपल्या भावना, विचार, इ.  सर्वांसमोर मांडण्यासाठी  जे व्यासपीठ उपलब्ध होतं ते  म्हणजे मीडिया. त्याचप्रमाणे सोशल मीडियाची जर व्याख्या करायची झाली तर ती अशी होईल ; 

“एक माध्यम जे समाजातील विविध स्तरांवरील लोकांची एकजूट करते तसेच ज्याद्वारे व्यापार, विचार आणि कलात्मकतेच्या देवाणघेवाणीच्या अनेक संधी उपलब्ध होतात व समाजातील अनिष्ट  रूढी-परंपरा, वृत्ती , विचार ह्यांचे चर्चात्मक प्रक्रियेने निरसन करता येते तसेच जनसमूहात शांततेचे वातावरण प्रस्थापित करण्यास जे मदत करते, आणि सर्वांची एकजूट करून एक वैश्विक कुटुंब जे निर्माण करतं ते  म्हणजे सोशल मीडिया" होय .

ह्याची सुरुवात झाली ती वृत्तपत्रांपासून. त्यानंतर जस-जसं  तंत्रज्ञान विकसित होत गेलं, तशी रेडिओ वर प्रसारण केंद्रे विकसित झाली. भारतात पाहिले आकाशवाणी केंद्र अर्थात ‛इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचे'  ‛नभोवाणी' हे रेडिओ केंद्र १९२७ साली सुरू झाले. मग पुढे जसजसे तंत्रज्ञानाच्या शाखेत नवनवीन शोध लागत गेले तशी माध्यम  प्रसारणाची नवनवीन उपकरणे बाजारात आली.  पण या सगळ्यांमधून फक्त एकमार्गी प्रसारण व्हायचं.  द्विमार्गी व्हावा असा संवाद काही त्यातून घडत नव्हता. म्हणूनच कालांतराने व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, इ. सोशल साईट्स चा जन्म झाला. त्याचबरोबर अनेक T.V माध्यमातून  विडिओ चॅटद्वारे थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होऊ लागली . मग यातून एखाद्या गोष्टीवर जनमत जाणून घेणं अगदी सोपं झालं तसच अनेक मैल दूर राहणाऱ्या माणसाचाही चेहरा बघणं तितकंच सोपं झालं. म्हणूनच या सगळयाचं एकत्रित रूप म्हणून सोशल मीडिया ‛आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग’ झालं

मग या सोशल मीडियाशी  तरूणाईची जवळीक इतक्या पटकन व सहजतेने कशी झाली ?  ह्याचं उत्तर आपण पुढच्या भागात शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया comment box मध्ये लिहा. लवकरच दुसरा भागही प्रदर्शित करत आहे!!!


Tuesday, August 25, 2020

सोशल मिडिया चर्चा आणि संभ्रम.

Social media एक कायमचाच वादग्रस्त राहिलेला विषय आहे. यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या वादात बहुतांश वेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली गेलेली तरुणाई की ज्यांना सोशल मीडिया हा शाप नसून एक संधी असं वाटतं असतं, आणि घरबसल्या फळ मिळत नाही त्याला बाहेरचं जग फिरावच लागतं असं खणखणीतपणे सांगणारी अनुभवी पिढी ही झुंज कायम राहिलेली आहे.

तुम्हाला वाटत असेल ही काही वेळ आहे का या विषयावर बोलण्याची?! पण माझ्यामते हीच ती वेळ!  कारण याच संकट काळात अनेेेक “तरुणांनी"  याच सोशल मीडियाचा वापर करून या आपत्तीला  संंधीमध्ये परिवर्तीत केलंय.

म्हणूनच सोशल मीडिया या विषयाला थोडसं सध्य परिस्थितीला अनुसरून समजून घेण्याचा प्रयत्न मी  सोशल मीडिया चर्चा आणि  संभ्रम या माझ्या नवीन लेखनमालेमधून करणार आहे.

यातील पहिला ब्लॉग मी लवकरच प्रदर्शित करणार आहे. तुमचे सल्ले आणि प्रतिक्रिया दोन्ही खुप महत्वाच्या आहेत. तुम्ही त्या कंमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता.


#socialmedia #मराठीब्लॉग 


दशावतार