Friday, December 14, 2018

माळ्याच्या मळ्यामध्ये बघूया काय काय चालतं!!!

शेत,शेतकरी आणि आत्महत्या! हे तीन शब्द जणू काही समीकरण बनत चालले आहेत. पारंपरिक शेती ,मग त्यामधून काही वेळा मिळणारे कमी उत्पादन, उत्पादन वाढविण्यासाठी साठी रासायनिक खतांचा होत असलेला अति वापर, आणि मग त्यामुळे मातीची खालावत चाललेली गुणवत्ता, आणि मग पर्यायाने एका विशिष्ट कालावधी नंतर जमीन सुपिक नसल्याने तोट्यात जाणारा शेतकरी आणि डोक्यावर घेऊन ठेवलेल्या प्रचंड काराजचा भार,आणि मग नाईलाजाने अवलंबलेला आत्महत्येचा पर्याय. असं सगळं एकंदरीत समीकरण होऊन बसलं आहे.अर्थात सहजाच एकदा मनात हा विचार येऊन गेला. कालावधी अर्थात सुट्टीचा होता कारण गम्मत अशी आहे की एकदा का रहाटगाडगे सुरु झालं की माग कुठल्याही सामान्य माणसाच्या मनात हा विचार येेेणार
नाही, असो. मला या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी होती. आता ह्यालाच म्हणतात योगायोग. आम्ही बाबांच्या एका मित्राचं गाव बघायला गेलो,आणि तोच बाबांचा मित्र म्हणजे ह्या सगळ्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून त्यावर उत्तर शोधणारा एक असामान्य अवलिया मला भेटला.श्रीकांत पन्हाळकर, त्याचं नाव. सोलापूर जिल्ह्यातील कंदरपासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं वडशिवाने हे त्याचस छोटंसं गाव.इतकं छोटं की एखादीटूथपेस्ट घ्यायची म्हंटली तरी सात किलोमीटर बाहेर यावं लागतं.तयामुळे तसं वातावरण शांत होतं.पोहोचल्यावर चहापान केलं आणि आम्ही शेत शिवार बघायला गेलो कारण आम्ही पुढच्या दिवशीच निघणार होतो
आम्ही शेतात निघालो ,जाता जाता काका आम्हाला तिथल्या शेतकऱ्यांच्या सध्याच्या  परिस्तिथीबद्दल सांगत होते . मी तिथली शेतकऱ्यांची अवस्था ऐकून थक्क झालो होतो. करण खरं सांगायचं झालं तर पशचिम महाराष्ट्रात राहात असल्याने शेतकाऱ्यांबद्दल अशी परिस्थिती ऐकण्यात किंवा पाहण्यात अली नाही. पण काका सांगत असलेल्या परिस्थितीचा आणि समोरील दृश्याचा काहीच ताळमेळ लागत नव्हता करण समोर मोठंच मोठं पसरलेलं शिवार ऊस,केळं,शेंगा,कलिंगड,आणि बरंच काही.... न रााहवल्याने मी त्यांना विचारलंच तुम्ही मग  हे सर्व कसं पीकवलत?? त्यावर तेे हसून म्हटले परंपरेला
तंत्रणयानाची जोड असली की काहीच अवघड नाही. होय ते असं म्हटले करण ते स्वतः बी. इ करून या क्षेत्रात उतरले होते.
त्यांनी आपल्या शिक्षणाचा फायदा करून नवनवीन तार्किबी आजमावल्या. त्यातली पहिली आणि गाजब तार्किब म्हणजे केळ्यामध्ये अंतर पीक म्हणून त्यांनी कलिंगडाची लागवड केली. सुरुवातीला अडचणी आल्या लोकांची साथ मिळाली नाही पण जसजसे परिणाम दिसू लागले तशी त्यांची वाह वाह होत गेली आणि गम्मत म्हणजे आता तीच लोकं त्यांचं अनुकरण करू पाहत आहेत. आणि आता त्यांनी सरकारी योजनांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी शेतात वीज आणली शेततळे उभ केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कलिंगडाची लोकांनी खिल्ली उडवली त्याच कलिंगडातून त्याला आता  दोन लाखांपर्यंत फायदा होतो आहे. आणि आता तो पुढे सध्या पन्नास टक्के सेंद्रिय असलेली त्याची शेती तो आता संपूर्ण सेंद्रिय करू पाहत आहे. मी स्तब्धतेने सगळं फक्त पाहत आणि ऐकत होतो.अशी ती अविस्मरणीय मळल्याची सफारी संपवून आम्ही घरी परत आलो. सगळं काही बघून एकाच वाक्य तोंडात येत होतं वाह क्या बात है!!
आम्ही घरी आलो तेव्हा सूर्य मावळतीला आला होता. मस्त सोनेरी प्रकाश, असं वाटत होतं की   कोणी तरी आकाशाच्या पडद्यामागून एक तांबूस स्पॉट लाईट मारत आहे. थोड्यावेळाने अंधारलं आणि तांबूस सोनेरी कवच नाहीसं होतंय तोपर्यंत आकाशाला चांदण्याच्या चादरीनं लपेटलं होतं.
आणि आता वेळ होती चुलीवरचं मस्त गावरान जेवणाचा आस्वाद घेण्याची . आम्ही जेवायला बसलो . हे मोठं ताट, पोळी,मस्तं रसदार मसालेदार वांग्याची भाजी, शेंगा चटणी, आमटी आणि भात. त्याक्षणी मला असं वाटलं ह्या मायेचा आणि आपुलकीचा आणि अस्सल गावरान स्वाद असलेल्या जेवणाला कुठल्याही इटालियन, मेक्सिकन, कॉंटिनेंटल, किंवा इंटरनॅशनल कुजिन ची सर नाही. जेवण झाल्यावर थोड्यावेळ मोकळया हवेत रेंगाळ्यावर पापण्या जड होऊ लागल्या . आणि त्याच गरवाऱ्यात मस्त पैकी ताणून दिली . सकाळी जग अली ती कोंबड्याच्या अरवण्याने आणि चिमण्यांच्या चिवचिवाटाने. सर्व आवरून आम्ही  न्याहारीला गेलो.ताजेतवाने करणारे वाफळलेले कांदे पोहे खाऊन मॅन प्रसन्न झालं. ह्या सगळ्या अनुभवांच्या आठवणी करून आम्ही निघालो . जाता जाता फक्त इतकच वाटून गेलं. तथाकथित स्ट्रेस रिलीजच्या नावा खाली  फालतू सिनेमा आणि मॉल वर पैशे उडवणाऱ्यांनी मॉल सोडून मळल्याची सफर करावी. आणि फक्त एकच शिकावं या शांत वातावरणातही बराच आनंद घेण्याजोगा असतो. शेवटी ह्याच छोट्या सहलीतून बरंच काही मोलाचं घेऊन आम्ही परतलो.......

Saturday, December 8, 2018

Experiences worth remembering

*An unexpected incident that stunned me with the shock*
-
Today morning ,at about 9:30 am  I was out just with my friends as it was a off lecture .Somehow while talking with one of my friends Shreyas, we went to Vishrambag station as he was going home and his cycle was parked at my another friend's house who stays beyond the railway line.
  After the railway departed ,he crossed the track and went to take his cycle.
 I decided to go to the college from the side where washrooms are located. I was just walking and suddenly I heard a puppy growling in pain. I thought it would be just a hungry little puppy but as I saw him was shocked to see that it met with an accident.

Its part from the waist was cut and it was crying in pain. May be train crushed it, but still it was alive. I called my friend back, we got some water for it. It was lying besides the railway track I took a cloth and brought him aside. It drank the water.  I called *RAHAT ANIMAL AMBULANCE* immidiately.
Thanks to them as they responded quickly and within a few minutes they were at the spot. We showed them the puppy. They said as its part from waist is cut it won't be able to excrete rather it won't be able to survive .The only thing we can do is help him lead a peaceful death. For a second (I) couldn't handle the shock .
But after a moment ,realized that must be only the noble help god might have assigned to me.......
 They gave him anesthesia and the injection which led him towards a peaceful death .we burried it.
Great lesson I learnt from it is that giving a peaceful freedom (death) is more noble than giving a life, that again to  growl and lead painful death.

दशावतार